Post Office Recruitment Saam TV
naukri-job-news

Post Office Recruitment 2024: पोस्ट ऑफिसमध्ये ४४,२२८ पदांसाठी भरती; १० वी पास उमेदवार करु शकणार अर्ज; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Post Office Bharti 2024: पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. तब्बल ४४,२२८ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठीी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यामध्ये GDS/ शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक असा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल ४४,२२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या नोकरीसाठी अर्ज करावा.

केंद्र सरकारअंतर्गत ही भरती सुरु आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीमध्ये निवड झाल्यास उमेदवाराला १२,००० ते २९,३८० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठीची जाहिरात पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. १५ जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.१८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. संपूर्ण भारतात या नोकरीसाठी अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. या नोकरीसाठी उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवता याला हवी. दहावीला मिळालेल्या मार्क्सच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

१५ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर कागदपत्रे पडताळणी केली जाईल. यात दहावीची मार्कशीट, ओळखपत्र, जन्मातारीख पुरावा सादर करण्यास सांगतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बजरंगाची कमाल...अन् जेवणाच्या पंगतीत वानर सेनेची धम्माल

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, बळीराजा संकटात

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT