Indian Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; १५०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Bank Recruitment 2025: इंडियन बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. इंडियन बँकेत १५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन बँकेत तब्बल १५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इंडियन बँकेत अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १८ जुलैपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२५ असणार आहे. एकूण १५०० पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता (Eligibility)

इंडियन बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. १ एप्रिल २०२१ नंतर ग्रॅज्युएशन केले असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ मध्ये असावी. राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यासाठी एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेमध्ये पास झाल्यावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना त्या प्रदेशातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT