Siddhi Hande
मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब कुटुंबातील नागरिकांना मदत केली जाते.
पूर, चक्रीवादळ व भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती तसेच मोठा अपघात, दंगलीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना मदत केली जाते.
याचसोबत हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, हात, खुबा, गुडघा प्रत्यारोपण, कर्करोग, अस्थिबंधन शस्त्रक्रिया, नवजात शिशु, लहान रस्ते अपघात, मेंदू आजार, हृदयरोग या आजारातदेखील मदत कृगिली जाते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ हजार रुपये, ५० हजार, १ लाख, जास्तीत जास्त २ लाख रुपयांचे आजारांनिहाय अर्थसहाय्य करण्यात येते.
अर्थसहाय्य मिळवण्यासाठीhttps://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरायचा आहे.
यानंतर पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी cmrfpune@gmail.com मेलवर कागदपत्रे आणि अर्ज पाठवायचा आहे.
सर्व कागदपत्रांची पीडीएफ aao.cmrf-mh@gov.in या मेलवर पाठवून द्यायची आहे.
अर्जासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल झाल्यास त्याचा जिओ टॅग छायाचित्र, निदान व उपचाराकरिता लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक द्यायचे आहे.
रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.