Indian Army  Saam Tv
naukri-job-news

Indian Army Recruitment: इंडियन आर्मीत नोकरीची संधी; ग्रुप सी पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Army Group C Recruitment: भारतीय आर्मीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आर्मीत ग्रुप सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

अनेकांची देशसेवा करण्याची इच्छा असते. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन अर्मीत ग्रुप सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.

इंडियन आर्मीतील (Indian Army Recruitment)या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे ज्यांना ग्रुप सी पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर करावा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे. इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

पात्रता

भारतीय सैन्यात ग्रुप सी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी, बारावी आणि आयटीआय प्राप्त केली केलेली असावी. याचसोबत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. याचसोबत उमेदवारांनी उंची १६५ सेंटीमीटर, छाती ८१.५ सेंटीमीटर आणि वजन ५० किलो असावे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणीद्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा रिजनिंग, जनरल नॉलेज, न्युमेरिकल अॅप्टीड्यूड टेस्ट होणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. तुम्ही आधी अधिसूचना वाचा त्यानंतरच अर्ज करावेत.

या पदांसाठी भरती

या भरती मोहिमेत लोवर क्लर्क डिविजन, फायरमॅन, व्हेईकल मॅकेनिक, फिटर, वेल्डर, ट्रेड्समॅन, वॉशरमॅन, कुक, टेलिकॉम मॅकेनिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

Maharashtra Live News Update : शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा ?

Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

Chicken Biryani Recipe: हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची?

Amla Benefits: दररोज एक आवळा खल्ल्याने शरिराला काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT