naukri-job-news

Post Office Recruitment: भारतीय डाक विभागात सर्वात मोठी भरती; २८,७४० पदे भरली जाणार; पात्रता फक्त १०वी पास

India Post Office GDS Recruitment 2026: भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. जीडीएस म्हणजेच ग्रामीण डाक सेवक पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

भारतीय डाक विभागात नोकरीची संधी

२०२६ मधील सर्वात मोठी भरती

२८,७४० जागांसाठी केली जाणार भरती

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील लाखो तरुणांना आता सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय डाक विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. २०२६ मधील भरतीची घोषणा करण्यात आली आहे. फक्त १०वी पास तरणांना सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही चांगली संधी आहे.

पोस्ट ऑफिसमधील या भरती मोहिमेअंतर्गत २३ डाक सर्किलमध्ये भरती होणार आहे. एकूण २८,७४० पदांसाठी ही भरती होणार आहे. ही वर्षभरातील सर्वात मोठी भरती असणार आहे.

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी (India Post Recruitment Without Exam)

डाक विभागातील ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड १०वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर प्रकाशित केली जाणार आहे. ३१ जानेवारी २०२६ पासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु होईल.

या भरती मोहिमेत ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्ट, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी फक्त १०वी पास असायला हवे. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

पगार

डाक विभागातील या नोकरीसाठी पगार पदानुसार वेगवेगळा असणार आहे. जीडीएस पदासाठी १०,००० ते २४,४७० रुपये पगार मिळणार आहे. शाखा पोस्ट मास्टर पदासाठी १२,००० ते २९,३८० रुपये पगार मिळणार आहे. हा पगार सरकारी नियमानुसार वाढवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये Wild card एन्ट्री; 'त्या' स्पर्धकाला पाहताच सदस्यांना बसला 440 व्होल्टचा धक्का| VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दिलासा, eKYC साठी मिळणार मुदतवाढ?

Heart Attack कमी तरी मृत्यूचं कारण तेच! या सवयी हृदयासाठी घातक, डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

Chandra Grahan 2026: पहिलं चंद्रग्रहण कधी लागणार? भारतात सूतक पाळावं लागेल का जाणून घ्या

SCROLL FOR NEXT