IMD Recruitment Saam Tv
naukri-job-news

IMD Recruitment: सरकारी नोकरीची संधी, हवामान विभागात भरती; पगार मिळणार १,२३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

IMD India Meteorological Department Jobs: भारतीय हवामान विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हवामान विभागात विविध प्रोजेक्टसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीची संधी

हवामान विभागात विविध पदांसाठी भरती

पगार मिळणार १,२३,००० रुपये

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारतीय हवामान विभागात विविध प्रोजेक्टसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

भारतीय हवामान विभागातील या नोकरीसाठी अर्जप्रकिया २४ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ डिसेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही mausam.imd.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

पात्रता

भारतीय हवामान विभागातील या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही M.Sc. पास केलेले असावे. तर काही पदांसाठी B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. यामध्ये एम.टेक केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

याचसोबत सायन्स, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम या विषयात पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांकडे पदवीसोबतच कॉम्प्युटर नॉलेज असणेही गरजेचे आहे. काही पदांसाठी अनुभव गरजेचा आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात. या नोकरीसाठी वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा.

भारतीय हवामान विभागातील प्रोजेक्ट सायंटिस्ट पदासाठी १,२३,१०० रुपये पगार मिळणार आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट III पदासाठी ७८००० रुपये पगार, प्रोजेक्ट सायंटिस्ट II पदासाठी ६७,००० रुपये पगार मिळणार आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट I पदासाठी ५६,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना पगारासोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : मेकअप न करताही मिळेल चेहऱ्यावर गुलाबी चमक, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Bihar Bhavan: मुंबईत उभारणार बिहार भवन; ३० मजली इमारत बांधणार, खर्च ३१४ कोटी; मनसेचा विरोध | VIDEO

Uddhav Thackeray : ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ

Vitamin B Deficiency: सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं

SCROLL FOR NEXT