Rajya Sabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीआधी भाजपचा विलीनीकरणाचा डाव; मित्रपक्षाची डोकेदुखी वाढली

Bihar Politics: राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपने उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक मोर्चात विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयामुळे बिहारमधील राजकारणात खळबळ उडालीय.
Bihar Politics:
Upendra Kushwaha amid growing political speculation over BJP’s merger proposal before the Rajya Sabha elections.Saam tv
Published On
Summary
  • राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा राष्ट्रीय लोकमोर्चाला विलीनीकरण प्रस्ताव.

  • उपेंद्र कुशवाह यांचा कार्यकाळ संपत असून पुनर्निवडीसाठी प्रयत्न.

  • चिराग पासवान यांचाही उमेदवारीसाठी दबाव वाढला.

राज्यात आपली ताकद आणखी वाढविण्यासाठी भाजपने आता मोठी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा पक्ष बनलाय. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच भाजपने आपल्या मित्रपक्षाला थेट विलीनीकरणाचा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.

Bihar Politics:
मुख्यमंत्र्यांकडून राज्यसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा; सुंदर अभिनेत्रीसह माजी IPS अधिकाऱ्याला संधी

भाजपने राष्ट्रीय लोकमोर्चा पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिलाय. या प्रस्तावाला आता राज्यसभा निवडणुकीशी जोडलं जातंय. पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने बिहारमध्ये १६ मार्चला निवडणूक होणार आहे. पुन्हा राज्यसभेत पोहोचण्यासाठी कुशवाह यांना भाजप किंवा संयुक्त जनता दलाच्या मतांशिवाय दुसरा पर्याय नाहीये.

Bihar Politics:
महत्वाची बातमी! होळीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार; संभाव्य तारखा आल्या समोर

भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळण्यासाठी कुशवाह प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनीही आपल्या पक्षाला उमदेवारी मिळावी, यासाठी दबाव वाढवलाय. त्यामुळे कुशवाह यांचे टेन्शन वाढलंय. त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण झाला तर त्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चांनी जोर धरलाय.

राज्यसभेत भाजपला स्वबळावर बहुमत नाहीये, त्यासाठी भाजपकडून विविध राज्यांमध्ये ताकद वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बिहारमध्ये कुशवाह यांचा पक्ष भाजपमध्ये आल्यास राज्यसभेतील संख्याबळ वाढेल. यासह बिहारमधील कुशवाह यांच्याशी संबंधित समाज थेट भाजपसोबत जोडला जाईल. दरम्यान कुशवाह यांनी काही वर्षांपूर्वी संयुक्त जनता दलालाल सोडचिठ्ठी देताना आपण आघाडी करू पण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कुशवाह यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com