IDBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

IDBI Recruitment: IDBI बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा? जाणून घ्या

IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडस्ट्रीय डेव्लपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेडने ही भरती जाहीर केली आहे. ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

आयडीबीआय बँकेने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेत एकूण ६८६ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.

आयडीबीआय बँकेतील (IDBI Recruitment) या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आयडीबीआय बँकेची(IDBI Bank Bharti) ही भरती महाराष्ट्रात होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. या परीक्षेची संभाव्य तारीख ८ जून ०२५ असेल. आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गासाठी १०५० रुपये शुल्क आहे.

आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी २० ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्टद्वारे होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT