
सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये (NMDC Recruitment) सध्या भरती सुरु आहे. चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. एनएमडीसी स्टीलने विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एनएमडीसीमधील या भरतीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्ही nmdcsteel.nmdc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
एनएमडीसी स्टीलमधील या भरती मोहिमेत एकूण ९३४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हाला या कंपनीत नोकरी करायची असेल तर ८ मे किंवा त्याआधी अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
एनएमडीसीमधील या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७६ जागा रिक्त जागा आहेत. उरलेले पदे ही राखीव प्रवर्गासाठी राखीव आहेत.
एनएमडीसी स्टीलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. विद्यापीठातून बी.टेक/बी.ई, डिप्लोमा, आयटीआय, पोस्ट ग्रेजुएट (PG) और सीए / एमबीए / पीजीडीएम / पीजी डिप्लोमा पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ५० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० ते १,७०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू आणि कागदपत्रे पडताळणीनंतर केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.