IDBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

IDBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IDBI बँकेत नोकरी; ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; पात्रता काय?

IDBI Bank Recruitment 2025: आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.आयडीबीआय बँकेत (IDBI Recruitment)सध्या भरती सुरु आहे. आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या बँकेत ऑफिसर होण्याची संधी आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती idbibank.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ एप्रिलपासून सुरु झाली आहे. म्हणजे आजपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) या भरती मोहिमेत एकूण ११९ पदे भरती केली जाणार आहेत. या नोकरीसाठी तुम्ही २० एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात. मुदतीपूर्वी अर्ज केल्यावरच तो स्विकारला जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.

आयडीबीआय बँकेतील या भरती मोहिमेत डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड डीसाठी ८ जागा रिक्त आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सीसाठी ४२ जागा रिक्त आहेत. मॅनेजर ग्रेड बी पदासाठी ६९ जागा रिक्त आहेत. ही भरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये केली जाणार आहे. यामध्ये आयटी, फायनान्स, लिगल अशा विविध विभागात भरती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत कामाचा अनुभव असायला हवा.२८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahila Rojgar Yojana: खुशखबर! महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१०,०००; तुम्ही पात्र आहात का? चेक करा

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

'हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, घरीच योगा करावा, कारण..'; भाजप आमदार पडळकर पुन्हा बरळले

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

SCROLL FOR NEXT