IDBI Bank Recruitment Google
naukri-job-news

IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी पदभरती; मिळणार १,२०,००० रुपये पगार

IDBI Bank Recruitment 2024: आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी पदभरती करण्यात येत आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रकिया जाणून घ्या.

Siddhi Hande

इंडस्ट्रीयल डेव्लपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकेत मोठी भरती घेण्यात येणार आहे. बँकेने नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. ३१ स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबाबत सर्व माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

आयडीबीआय बँकेत तज्ञ अधिकाऱ्याच्या भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदव्युतर पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्ष असावे. डेप्युटी जनरल मॅनेजर (Grade D) या पदासाठी वयोमर्यादा ३५-४५ वर्ष आहे.मॅनेजर (Grade B) या पदासाठी २५ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. IDBI SO पदासाठी सामान्य, ओबीसी आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार आहे.

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये तर SC/ST प्रवर्गातील लोकांसाठी २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराची निवड पात्रतेच्या आधारे केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. त्यानंतर गट चर्चा (Group Discussion),मुलाखत (PI) याद्वारे भरती केली जाणार आहे. उमेदवारांचे संवाद कोशल्य,ज्ञान या गोष्टींच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी घेतली जाते. त्यानंतर वैद्यकीय परीक्षा द्यावी लागते.

आयडीबीआयच्या भरती परीक्षेत उमेदवारांची निवड झाल्यास डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी दर महिना १०२,३०० रुपये ते १,२०,९४० रुपये पगार मिळेल. तर मॅनेजर ग्रेड सी पदासाठी निवड झाल्यास प्रति महिना ८५,००० ते १०५,२८० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT