IBPS Clerk Exam Google
naukri-job-news

IBPS Clerk Exam: सरकारी बँकेत तब्बल ६००० जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर...

IBPS Clerk Exam Application Date: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयबीपीएस लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने अधिसूचना जाहीर केली आहे. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.दरवर्षी आयबीपीएस परीक्षेद्वारे देशातील सरकारी बँकामध्ये नियुक्ती केली जाते. IBPS लिपिक (IBPS Clerk Recruitment)अधिसूचना १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. यावर्षी ६ हजारांपेक्षा जास्त लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. (Bank Job)

आयबीपीएस लिपिक २०२४ (IBPS Clerk 2024)पदांसाठी १ जुलैते २१ जुलैपर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात. IBPS लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. (IBPS Exam Clerk Eligiibility)त्याचसोबत उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे. अर्जदाराचे वय किमान २० ते २८ वर्ष असावे. यासाठी तुम्ही IBPSच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ऑनलाइन परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आयबीपीएसची परीक्षा कठीण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ज्या उमेदवारांना खरच बँकेत काम करायचे आहे. त्यांनी आतापासूनच तयारी करायला हवी.

जर तुम्हाला बँकेत काम करायची इच्छा असेल तर पंजाब नॅशनल बँकेतदेखील भरती सुरु आहेत. बँकेत २७०० शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पंजाब नॅशनल बँकेत अर्ज करण्याची प्रक्रिया ३० जून २०२४ पासून सुरु झाली आहे. तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. त्याचसोबत तुम्ही आयबीपीएस परीक्षेसाठीदेखील तयारी करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, बार्शीत एकाच प्रभागात २ उमेदवार विजयी

Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...

मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा, नेमके काय घडले? VIDEO

Nagarparishad Election Result: सुरूवातीचे कल हाती! महायुती १९० पालिकांमध्ये आघाडीवर, महाविकास आघाडीची स्थिती काय?

Gold Rate Today: सोन्याचे दर जैसे थे वैसे! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT