Job in IBPS Bank Saam TV
naukri-job-news

IBPS Recruitment 2024: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी;६ हजार पदांसाठी सुरु आहे भरती; पात्रता, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Job Vacancy in IBPS For Clerk Position: दरवर्षी आयबीपीएसद्वारे बँकेमध्ये भरती केली जाते. नुकतीच आयबीपीएसने क्लर्क पदासाठी भरती जाहीर केली आहे. जवळपास ६ हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँकेत आयबीपीएसद्वारे भरती सुरु आहे. आयबीपीएस क्लर्क या परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आयबीपीएसद्वारे सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी संधी आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शनने क्लर्क पदासाठी ६ हजारांपेपेक्षा जास्त रिक्त जांगावर भरती केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज १० जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.२१ जुलै ही नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, ही तारीख आता वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार आता २८ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ibps.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.हे अर्ज प्रामुख्याने IBPS Clerk CRP 14 Exam 2024 साठी आहे.यासाठी तुमची प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तुमची मुलाखत घेतली जाईल. त्यात पास झाल्यावर तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची संधी मिळेल.

या नोकरीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या परीक्षेसाठी ८५० रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागेल. याची प्रिलियम परीक्षा २४,२५ आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येईल. या नोकरीसाठी पहिल्या तीन वर्षी पगार १९,९०० रुपये असेल. त्यानंतर तो वर्षाला वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav ST Collection : एसटी महामंडळाला गणराया पावला; रत्नागिरी विभागाचं विक्रमी उत्पन्न

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

Accident News : बसमधून खाली उतरताच घडले भयानक; घराजवळच महिलेला एसटीने चिरडले

'Bigg Boss 19' फेम तान्या मित्तलचे साडी प्रेम, पाहा Unseen Photo

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

SCROLL FOR NEXT