Government Job Google
naukri-job-news

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Hindustan Shipyard Recruitment: हिंदुस्तान शिपयार्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मॅनेजर, सुपरिटेंडंट अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या हिंदुस्तान शिपयार्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये तुम्हाला मॅनेजर पदावर नोकरी करण्याची संधी आहे. हिंदुस्तान शिपयार्डमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

हिंदुस्तान शिपयार्डमध्ये मॅनेजर, कंसल्टंट, प्रोजेक्ट सुपरिटेंडेंटसह अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. hslvizag.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.

हिंदुस्तान शिपयार्डमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी एकूण ४७ पदांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ९ ऑगस्च २०२५ पूर्व अर्ज करु शकतात. नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान शिपयार्डमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन डिग्री, बी.टेक/बी.ई, डिप्लोमा, एमबीए, पीजीडीएम आणि एलएलबी पदवी प्राप्त केलेली असावी. शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

मॅनेदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा४० वर्षे असावी, प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट पदासाठी ५७, डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी ४० किवा ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

पगार

मॅनेजर पदासाठी ६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट पदासाठी १,७०,००० रुपये पगार मिळणार आहे. डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी ७३,००० रुपये पगार तर सिनियर कंसल्टंट पदासाठी १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. कंसल्टंट पदासाठी १ लाख रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT