HAL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HAL Recruitment: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Hindustan Aeronautics Limited Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विजिंटिंग कंसल्टंट पदासाठी ही भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये सध्या विजिंटिंग कंसल्टंट (नेफ्रॉलॉजी) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (HAL Recruitment)

एचएएलमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी त्याआधी अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावे.या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS केलेले असावे. याचसोबत MD (जनरल मेडिसिन)+ DM/DNB (नेफ्रोलॉजी) पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५ वर्षांचा अनुभव असावा.

या नोकरीसाठी अर्ज करताना बर्थ सर्टिफिकेट, शैक्षणिक प्रात्रतेचे सर्टिफिकेट, कामाच्या अनुभवाचे सर्टिफिकेट तुमच्याजवळ असायला हवे.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना वेबसाइटवर दिलेल्या फॉर्मॅटमध्ये अर्ज भरायचा आहे. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवायची आहेत. तुम्हाला अर्ड टीफ जनरल मॅनेजर (एचआर), औद्योगिक स्वास्थ केंद्र, हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (बंगळुरु कॉम्पलेक्स), सुरंजनदास रोज, बंगळुरु-५६००१७ येथे पाठवायचा आहे.

IRCTC मध्ये भरती

आयआरसीटीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिज्म कॉर्पोरेशनमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. ६ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर महागाई भत्ते वैगेरे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT