HAL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची संधी, या पदांसाठी भरती सुरु; वाचा सविस्तर

HAL Recruitment 2025: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिसशिप पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये (Hindustan Aeronautics Recruitment) नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये १ वर्षांसाठी अप्रेंटिसशिप जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (HAL Recruitment 2025)

आयटीआय (ITI) केलेल्या उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. अप्रेंटिसशिप पदासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. तुम्ही apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून सुरु झाली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी एकूण ३१० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एनसीवीटी किंवा एससीवीटी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. याचसोबत त्यांच्याकडे इतर शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे यासंदर्भातील कागदपत्रे असावीत.

अर्ज कसा करावा? (How To Apply)

अर्ज करण्यासाठी सर्वात आधी apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्ही स्वतः ला रजिस्टर करा.

यानंतर तुम्हाला गुगल फॉर्म दिसणार आहे. तो पूर्णपणे भरायचा आहे.

यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवायची आहे.

निवडप्रक्रिया (HAL Selection Process)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांना ७० टक्के वेटेज देण्यात आले आहे तर आयटीआयच्या गुणांना ३० टक्के वेटेज देण्यात आले आहे.त्यामुळे तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर तुमची निवड केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT