सरकारी नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. परंतु अनेकदा सरकारी नोकरी म्हटल्यावर परीक्षा द्यावी लागते, असं अनेकांच्या मनात येते. सध्या सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये ३८८३ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचावी. (Yantra India Limited Recruitment)
केंद्र सरकारच्या कंपनीमध्ये भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०वी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शिकाऊ उमेदवार पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
नॉन आयआयटी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तर आयआयटी उत्तीर्ण उमेदवारांसाठी NCVT किंवा SCVT मधून प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना जावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (Government Job)
सध्या राष्ट्रीय बियाणे महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळात १८८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. या भरतीमध्ये मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ट्रेनी पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.