आदिवासी विकास मंत्रालयाने (Ministry Of Tribal Affairs) रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आदिवासी विकास विभागात ज्युनिअर टेक्नीकल कन्सलटंट (Junior Technical Consultant) आणि क्वालिटी अशुरन्स विंग आणि फिल्डसाठी ज्युनिअर टेक्नीकल कन्सलटंट या पदांसाठी ही भरती आहे. या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज पाठवण्यास सांगितले आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० पेक्षा जास्त नसावे.
या पदांसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा/ बीई किंवा बी टेक केलेले असावे. या नोकरीत उमेदवारांना दर महिना ४५ हजार रुपये पगार दिला जाईल. याची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.
आदिवासी कार्य मंत्रालय भरती २०२४ च्या भरतीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन मुलाखतीच्या आधारावर आहे. अर्जदारांची नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाईल. या नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारांना भारतात वेगवेगळ्या ठिकाणी काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज पाठवावा लागेल. जॉइंट कमिशनर (NESTS), गेट नंबर 3A, जीवन तारा बिल्डिंग, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली110001 या पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवावा लागेल.
आदिवासी व्यव्हार विभागात ज्युनिअर टेक्नीकल कन्सलटंट आणि क्वालिटी अशुरन्स विंग आणि फिल्डसाठी ज्युनिअर टेक्नीकल कन्सलटंट पदांसाठी १५ जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे. याबाबत तुम्हाला सर्व माहिती https://studycafe.in/wp-content/uploads/2024/06/Ministry-of-Tribal-Affairs-pdf.pdf या साइटवर मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.