NTPC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NTPC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC मध्ये भरती; पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

NTPC Recruitment 2025: एनटीपीसीमधील नोकरीची सुवर्णसंधी आहे. एनटीपीसीमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ मार्चपासून सुरु झाली आहे.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांनी careers.ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये कंपनी सेक्रेटरीसाठी जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. यामध्ये ७ वर्षांचा अनुभव लिस्टेड कंपनीमध्ये असावा. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ३०० रुपये शुल्क भरायचे आहे. यासाठी तुम्ही careers.ntpc.co.in यावर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुम्ही प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT