MPSC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MPSC Recruitment: MPSC च्या २२५ जागांसाठी भरती, उद्यापासून अर्ज भरता येणार, पात्रता काय?

MPSC Recruitment 2025: एमपीएससीमार्फत २२५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य गट अ या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने नवीन भरती जाहीर केली आहे. एमपीएससीने जवळपास २२५ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

एमपीएससीने जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य गट अ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (MPSC Recruitment)

वैद्यकीय व आरोग्य सेवेत ही भरती केली जाणार आहे. यामध्ये राखीव प्रवर्गासाठी, खेळाडू, महिला, दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव जागा देण्यात आल्या आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ जानेवारी म्हणजेच उद्यापासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचसोबत ऑनलाइन पद्धतीने अर्जशुल्कदेखील भरायचे आहे. (MPSC Recruitment 2025)

आरोग्य विभागात ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केलेलं असायला हवे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. हे वय १ मे २०२५ पर्यंत मोजले जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७१९ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४४९ रुपये फी भरायची आहे.अर्ज करताना तुम्हाला https://mpsconline.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर सूचना वाचून तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरुन सबमिट करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT