Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: १०वी पास ते पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; निती आयोगात भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Niti Aayog Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. निती आयोगात विविध पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. निती आयोगात नोकरीची सुवर्णसंधी आहे. निती आयोगात स्टाफ कार ड्रायव्हर, कुक, डायरेक्टर जनरल पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या चांगल्या विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. १०वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. (NITI Aayog Recruitment)

प्रोटोकॉल ऑफिसर भरतीसाठी अर्ज करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. स्टाफ ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ आहे. असिस्टंट कुक पदासाठी २६ जानेवारी २०२५, डायरेक्टर जनरल पदासाठी १८ फेब्रुवारी २०२५ आणि प्रोटोकॉल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीक १२ फेब्रुवारी २०२५ आहे. (Niti Aayog Recruitment 2025)

नीती आयोगातील स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास केलेली असावी. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे.कुक पदासाठी कॅटरिंग डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. डीजी पदासाठी इकोनॉमिक्स/ सोशियोलॉजी / ह्युमॅनिटीज / ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये मास्टर्स डिग्री केलेली असावी.प्रोटोकॉल ऑफिसर पदासाठी बॅचलर डिग्री केलेली असावी.

या नोकरीबाबत तुम्हाला सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT