सरकारी कंपनीत नोकरीची संधी
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायजर्समध्ये भरती जाहीर
मिळणार पगार १.४० लाख रुपये
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत सरकारची नवरत्न कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या कंपनी मॅनेजमेंट ट्रेनी (सेफ्टी) पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिकृत अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलाइजर्समधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही rcfltd.com वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही २० डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
राष्ट्रीय फर्टिलायजर्स लिमिटेडमध्ये एकूण ८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २७ वर्ष असावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लेखी परीक्षा आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ४ वर्षीय केमिकल इंजिनियरिंग /पेट्रोकमिकल/केमिकल टेक्नोलॉजीमध्ये बी.ई किंवा बी.टेक पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत तीन वर्षांचा बीई किंवा बीटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. ३ वर्षांचा इंजिनियरिंग डिप्लोमा केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
पगार
या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १ वर्षाच्या ट्रेनिंगदरम्यान ६०,००० रुपये पगार मिळणार आहे. यानंतर E1 ग्रेडनुसार ४०००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.