MSRTC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MSRTC Recruitment: खुशखबर! एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

MSRTC Recruitment 2025: एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात सध्या समुपदेशक पदांसाठी भरती सुरु आहे. नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सांगली येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात (MSRTC) समुपदेशक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. समुपदेशक पदासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही नेमणूक मानद तत्वावर होणार आहे. १ वर्षासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळात एकूण २ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युतर पदवी प्राप्त केललेी असावी. मानसशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन (M.A in Psychology) केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थांमध्ये कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा.

सांगली (Sangli)येथे ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला पेपरवर अर्ज लिहावा त्यावर तुमचा फोटोदेखील चिटकवावा, यानंतर अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखल, शैक्षणिक प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे जोडावे. हा अर्ज तुम्ही २१ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करायचा आहे. तुम्हाला विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली, पिन ४१६४१६ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT