HAL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HAL Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

HAL Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. डिप्लोमा टेक्निशियन ते ऑपरेटर अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (Hindustan Aeronautics Limited Recruitment)

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये ५७ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे. त्यात डिप्लोमा टेक्निशियन (मॅकेनिकल) पदासाठी ८ रिक्त जागा आहेत. डिप्लोमा टेक्निशिनयनसाठी २ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल डिप्लोमा

टेक्निशियन पदासाठी २ जागा तर इलेक्ट्रिकल डिप्लोमा टेक्निशियन FSR साठी ३ जागा रिक्त आहेत. ऑपरेटर, फिटर, टर्नर अशा विविध पदांसाठीही रिक्त जागा आहेत.

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला २०० रुपये फी भरावी लागणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदानुसार संबंधित क्षेत्रात इंजिनियरिंग डिप्लोमा/ केमिस्ट्रीमध्ये एमएससी/ आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्ष असावे. (HAL Recruitment 2024)

अर्ज कसा करावा? (Application Process)

  • सर्वप्रथम तुम्हाला हिंदुस्तान एयरोनॉटिक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर करिअर या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर अप्लाय ऑनलाइन यावर क्लिक करा. तुमची सर्व माहिती भरुन सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करा.

  • यानंतर तुमची माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT