Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: तरुणांसाठी नोकरीची संधी; कर्मचारी राज्य विमा महामंडळात सुरू आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Government Job : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

Siddhi Hande

कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्या तरुणांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

कर्मचारी कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे १५ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बायोकेमिस्ट्री,फार्माकोलॉजी, कम्युनिटी मेडिसिन, एनाटॉमी, फिजियोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि एफएमटीचे पदे आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मेडिकल कॉलेज किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस डिग्री प्राप्त असणे गरेजेचे आहे. याचसोबत उमेदवारांने १ वर्षासाठी इंटर्नशिप केलेली असणे गरजेचे आहे.

भरतीसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्ष असावे.अधिसूनेनुसार, उमेदवारांना ५६,१०० रुपये मासिक वेतन मिळेल. याबाबत सर्व माहिती esic.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना १६ ऑगस्टआधी अर्ज करावा लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता डीन ऑफिस,ESI PGIMSR, ESI मेडिकल कॉलेज,ESISC हॉस्पिटल आणि ODZ ,जोका येथे घेतली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT