Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

वॅफल्स बनवण्यासाठी मैदा, दूध, अंडी, साखर, बटर, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि चिमूटभर मीठ घ्या.

Chocolate Waffle Recipe

कोरडे साहित्य एकत्र करा

एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, साखर आणि मीठ घेऊन सर्व साहित्य चांगले मिसळून घ्या.

Chocolate Waffle Recipe

ओले साहित्य तयार करा

दुसऱ्या भांड्यात अंडी फेटून त्यात दूध, वितळलेले बटर आणि व्हॅनिला इसेन्स घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

Chocolate Waffle Recipe

वॅफल बॅटर तयार करा

ओले मिश्रण हळूहळू कोरड्या मिश्रणात घाला. गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने हलकेच मिक्स करा. बॅटर खूप पातळ किंवा घट्ट ठेवू नका.

Chocolate Waffle Recipe

वॅफल मेकर गरम करा

वॅफल मेकर प्रीहीट करून त्यावर थोडे बटर किंवा तेल लावा. तयार बॅटर योग्य प्रमाणात वॅफल मेकरमध्ये ओता.

Chocolate Waffle Recipe

वॅफल्स कुरकुरीत होईपर्यंत शिजवा

वॅफल मेकर बंद करून वॅफल्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. तयार झाल्यावर काळजीपूर्वक बाहेर काढा.

Chocolate Waffle Recipe | yandex

आवडीनुसार टॉपिंग करा

गरमागरम वॅफल्सवर मध, चॉकलेट सॉस, मेपल सिरप, ताजी फळे, व्हीप्ड क्रीम किंवा आईस्क्रीम घालून सर्व्ह करा.

Chocolate Waffle Recipe

Skin Care: ग्लोइंग स्किनसाठी रोजच्या 'या' ७ चुका ठरू शकतात घातक; जाणून घ्या आयुर्वेदानुसार अशी घ्या त्वचेची काळजी

Skin Care
येथे क्लिक करा