Shruti Vilas Kadam
गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे चेहरा धुताना साधे किंवा कोमट पाणी वापरणे योग्य आहे.
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात त्वचेच्या गरजा बदलतात. त्यामुळे हवामान आणि त्वचेच्या प्रकारानुसार क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि इतर प्रोडक्ट निवडणे महत्त्वाचे आहे.
हायड्रेशनसाठी पाणी आवश्यक असले तरी सकाळी एकाच वेळी खूप पाणी पिण्याची गरज नाही. दिवसभर तहान आणि शरीराच्या गरजेनुसार थोडे-थोडे पाणी प्यावे.
सामान्य किंवा कोरडी त्वचा असल्यास सकाळी फक्त पाण्याने चेहरा धुणे पुरेसे ठरू शकते. तेलकट त्वचेसाठी सौम्य क्लिन्झर वापरता येतो.
साबणामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे चेहऱ्यासाठी तयार केलेला सौम्य क्लिन्झर वापरणे अधिक योग्य ठरू शकते.
निरोगी त्वचेसाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, हायड्रेशन आणि नियमित दिनचर्याही महत्त्वाची आहे. आहारात फळे, भाज्या, डाळी, बिया आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
सतत पिंपल्स, खाज, लालसरपणा, अचानक पिग्मेंटेशन किंवा कोरडेपणा जाणवत असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या