Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Shreya Maskar

नखांची वाढ

नखांची वाढ व्यक्तीचे वय, आहार, हार्मोन्स आणि एकूण आरोग्यानुसार बदलू शकते. मात्र नखांची अचानक अतिवाढ, जाडी वाढणे, रंग किंवा आकार बदलणे यामागे काही आरोग्य समस्या असू शकतात.

Nail growth | pinterest

थायरॉईड

थायरॉईडच्या काही विकारांमध्ये नखांच्या वाढीचा वेग, पोत किंवा नख बेडपासून वेगळे होणे असे बदल दिसू शकतात. तसेच शरीराला पुरेसे लोह, प्रथिने आणि इतर पोषक घटक न मिळाल्यास नखांच्या वाढीवर आणि मजबुतीवर परिणाम होऊ शकतो.

Thyroid | pinterest

बुरशीजन्य संसर्ग

नखे जाड होणे, विकृत होणे, पिवळसर होणे आणि असामान्य पद्धतीने वाढणे ही बुरशीच्या संसर्गाची लक्षणे असू शकतात. सोरायसिसमध्ये नखांवर छोटे खड्डे, जाडी वाढणे, रंग बदलणे किंवा नख त्वचेपासून वेगळे होणे असे बदल होऊ शकतात.

Fungal Infection | pinterest

रक्ताभिसरणाची समस्या

हात-पायांमध्ये रक्तपुरवठा कमी असल्यास नखांची सामान्य वाढ आणि त्यांचा पोत प्रभावित होऊ शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींना बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते आणि त्यामुळे नख जाड किंवा विकृत होऊ शकतात.

Circulation problems | pinterest

किडनी

यकृत, किडनी यांसारख्या आजारांमध्ये नखांचा रंग, आकार, जाडी किंवा पोत बदलू शकतो. खूप वेळ नखांमध्ये असे बदल दिसून येत राहीले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kidney | pinterest

नखांमधील बदल

नखांमध्ये अचानक बदल, खूप जाडी वाढणे, वेदना, सूज, पू, नखाचा रंग बदलणे, नख त्वचेपासून वेगळे होणे किंवा अनेक नखांमध्ये एकाच वेळी बदल दिसत असल्यास त्वरीत त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य आहे.

Changes in nails | pinterest

हार्मोनल विकार

ॲक्रोमेगलीमध्ये (हार्मोनल विकार ) शरीरात ग्रोथ हार्मोन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हात-पाय आणि शरीरातील काही मऊ ऊती वाढू शकतात. नखांमध्ये जाडी आणि कठीणपणा वाढणे हेही त्वचा-नखांशी संबंधित बदलांपैकी एक आहे.

hormonal disorder | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : दररोज ७ तासांपेक्षा कमी झोपता? आरोग्यावर होतात 'हे' ५ गंभीर परिणाम

Sleeping | AI PHOTO
येथे क्लिक करा...