अकोला महापालिकेतील शिंदे गटाच्या शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक सागर भारुका यांच्यावर खंडणीसह इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी ही धडक कारवाई करत, रात्री उशिरा सागर भारुका यांना अटक केली आहे. अकोल्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
बसस्थानक परिसरातील 'हॉटेल कृष्णा इम्पेरियल'मध्ये ३ ऑक्टोबरच्या रात्री जाऊन गोंधळ घातल्याचा आणि हॉटेल मालकाकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हॉटेल कर्मचारी शोएब अख्तर जमील अख्तर यांनी याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारुका यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
भाजपच्या दबावामुळे गोवल्याचा आरोप
अटक झाल्यानंतर सागर भारुका यांनी राजकीय षड्यंत्राचा आरोप केला आहे. "महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी मला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले आहे," असा दावा भारुका यांनी केला आहे.
दरम्यान, यापूर्वीही भारुका यांचा महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांच्याशी जोरदार वाद झाला होता. त्या प्रकरणातही भारुका यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता या नव्या प्रकरणामुळे तक्रारदाराचे आरोप, पोलिसांची कारवाई आणि भारुका यांचा राजकीय दावा यावरून अकोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.