Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी; कोल इंडिया लिमिटेडमध्ये भरती सुरु; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Coal India Limited Recruitment: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या कोल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर सध्या कोल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

कोल इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Coal India Job)

कोल इंडियामधील या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला www.coalindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

कोल इंडिया लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून पुढच्या महिन्याभरात तुम्ही अर्ज करु शकतात. एकूण ६४० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मायनिंगमध्ये २६३ रिक्त जागा आहेत. सिविलसाठी ९१ रिक्त जागा आहेत. इलेक्ट्रिकलसाठी १०२ रिक्त पदे आहेत.मेकॅनिकलसाठी १०४ रिक्त पदे आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असायला हवी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना वाचून घ्या. (Coal India Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बीई/ बीटेक केलेले असावे किंवा संबंधित इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Coal India Limited Recruitment 2024)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News : फडणवीसांचा वरचष्मा : भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Nanded Lok Sabha : नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Rohit Sharma: रोहितला संघात घेण्यासाठी मुंबईने किती रक्कम मोजली होती?

तामिळ भाषेत चहाला काय म्हटलं जातं? फारच वेगळं आहे नाव!

World : जगात 'या' देशात आहे फक्त एक हॉस्पिटल

SCROLL FOR NEXT