Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: मुंबई हायकोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, पगार १ लाख रुपये; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Bombay High Court Recruitment: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. उच्च न्यायालयात मुख्य संपादक, संपादक, उप संपादक आणि सहायक संपादक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Bombay High Court Recruitment)

मुंबई उच्च न्यायालयातील या भरती मोहिमेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे गरजेचे आहे. LLB पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. मुख्य संपादक पदासाठी कायद्यावी पदवी त्याचसोबत अनुभव आणि निवृ्त्त जिल्हा न्यायाधीश अर्ज करु शकतात.संपादक पदासाठी कायद्याची पदवी त्याचसोबत निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा निवृत्त सचिव, निवृत्त अधिकारी अर्ज करु शकतात.उपसंपादक पदासाठी कायद्याची पदवी आणि निवृत्त न्यायिक अधिकारी अर्ज करु शकतात. (Bombay High Court Job)

या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. मुख्य संपादक पदासाठी १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.संपादक पदासाठी १ लाख रुपये पगार मिळणार आहे. उपसंपादक पदासाठी ८०,००० रुपये पगार मिळणार आहे. सहायक संपादक पदासाठी ६०,००० रुपये पगार मिळणार आहे. ३५ ते ६९ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. इच्छुक उमेदवारांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT