High Court Job Saam Tv
naukri-job-news

High Court Job: १२ वी पास उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; २९१ जागांवर होणार भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

High Court Recruitment: उच्च न्यायालयात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती सुरु आहे. १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयात लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी २९१ जागा रिक्त आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहे त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२ वी पास उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

कोलकत्ता उच्च न्यायालयात नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही culcuttahighcourt.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीथ २६ ऑगस्ट २०२४ आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने पश्चिम बंगाल उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेतून उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे १२ वी उत्तीर्ण केली असावी. याचसोबत उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष असावे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराला ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी भरती प्रक्रिया परीक्षेद्वारे घेतली जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम प्रिलियम परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर अजून एक परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर पास झालेल्या उमेदवारांना वाइवा म्हणजेच तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर पास झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT