Remal Cyclone Update : पश्चिम बंगाल ते बांगलादेशापर्यंत 'रेमल' वादळाचा कहर; अनेक ठिकाणी बत्ती गुल, एकाचा मृत्यू

Remal Cyclone News : बांगलादेश ते पश्चिम बंगालपर्यंत रेमल वादळाचा तडाखा बसला आहे. बांगलादेश ते पश्चिम बंगालपर्यंत नागरिकांना या वादळाचा फटका बसला आहे.
 पश्चिम बंगाल ते बांगलादेशापर्यंत 'रेमल' वादळाचा कहर; अनेक ठिकाणी बत्ती गुल, एकाचा मृत्यू
Remal Cyclone UpdateSaam tv

नवी दिल्ली : बांगलादेश ते पश्चिम बंगालपर्यंत 'रेमल' वादळाचा कहर पाहायला मिळत आहे. बांगलादेश ते पश्चिम बंगालपर्यंत या वादळाचा तडाखा बसला आहे. 'रेमल' वादळामुळे बांगलादेशातील किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागात जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहे. काही भागात विजेचे खांब पडल्यामुळे बत्ती देखील गुल झाली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, 'कोलकातामध्ये तुफन पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हवामान विभागानुसार, बांगलादेशच्या मोंगला बंदराच्या किनारी भाग आणि पश्चिम बंगालच्या द्वीप समूहात १३५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहत आहेत.

 पश्चिम बंगाल ते बांगलादेशापर्यंत 'रेमल' वादळाचा कहर; अनेक ठिकाणी बत्ती गुल, एकाचा मृत्यू
Maharashtra Rain Update: राज्यभरात अवकाळी पावसाचं थैमान, वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळली; अनेक ठिकाणी घरांची पडझड

वादळाचा कहर

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रेमल वादळ हळूहळू उत्तर-पूर्व भागाकडे सरकत आहे. कच्च्या घरांचे पत्रे उडाले. बांगलादेशासहित पश्चिम बंगालपर्यंत मातीचे घरे जमीनदोस्त झाले आहेत. या वादळात एकाचा मृत्यू झाला आहे. या पावसात बत्ती गुल झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागत आहे.

लाखो लोक स्थलांतरीत

पश्चिम बंगाल ते बांगलादेशापर्यंत चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. बांगलादेश आणि भारताने आधी देखील अशा वादळाचा सामना केला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने तयारी केली होती. तर मोंगला, चटगाव बंदर, किनारपट्टीभागातून साधारण ८ लाख लोकांना इतरत्र हलविण्यात आलं होतं. भारतातील १ लाख लोकांना गावापासून इतर हलविण्यात आलं.

 पश्चिम बंगाल ते बांगलादेशापर्यंत 'रेमल' वादळाचा कहर; अनेक ठिकाणी बत्ती गुल, एकाचा मृत्यू
Mumbai Rain: मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार; शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार, हवामान विभागानं काय सांगितलं?

बांगलादेशातील राजधानी ढाकामध्ये चक्रीवादळापासून बचाव होण्यासाठी ८ हजार निवारे बांधण्यात आले होते. भारतात नौदलाने बोट, एअरक्राफ्ट, औषधांची तयारी केली आहे. जोरदार वाऱ्यासहित कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी जमा झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com