Remal Cyclone
Remal CycloneSaam Digital

Remal Cyclone : ताशी १२० किमी वेग, तुफान पाऊस, 'रेमल' घालणार थैमान; बंगालमधील परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

Remal Cyclone News : रेमल चक्रीवादळ ताशी ११० ते १२० किमीच्या वेगाने बंगालच्या दिशेने पुढे सरकत असून पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आढावा घेतला.

रेमल चक्रीवादळ ताशी ११० ते १२० किमीच्या वेगाने बंगालच्या दिशेने पुढे सरकत असून पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. आज रविवारी रात्री हे भयंकर वादळ बांगलादेशच्या खेपूपारा येथील मोंगला आणि पश्चिम बंगालमधील सागर बेटाला धडकणार आहे. रेमल चक्रीवादळाचा वेग १३५ किमीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्रीवदळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या तयारीचा नरेंद्र मोदींनी आढावा घेतला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि महत्त्वाच्या सूचना केल्या. वादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ पुढच्या 6 तासांत वादळात रूपांतरित होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळ 21 तासांसाठी बंद ठेवण्यात आले असून शेकडो गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, कोलकाता, पूर्व मिदनापूर, हावडा, हुगळी येथे मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Remal Cyclone
Delhi Hospital Fire: बेबी केअर सेंटरचा मालक नवीनला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव

24 परगणा आणि पूर्व मिदनापूर या दोन्ही ठिकाणी काही ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता आहे. तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात 20 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम मेदिनीपूर, नादिया, पूर्व बर्दवानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी दोन्ही 24 परगणा भागात पावसासह ताशी 100 ते 120 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोलकाता, हावडा, हुगळी आणि पूर्व मिदनापूरमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किमीपर्यंत पोहोचू शकतो. वादळाचा कमाल वेग तात्पुरता 90 किमी प्रति तास असू शकतो.

Remal Cyclone
Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीआमध्ये मृत्यूतांडव! संपूर्ण गाव उद्ध्वस्त..., भूस्खलनामुळे 670 जण ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com