गुगलमध्ये इंटर्नशिपची संधी मिळवा!  Google
naukri-job-news

Google Internship: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत इंटर्नशिपची संधी, अर्ज कसा करणार?

Tech Opportunities: गुगलसारख्या मोठ्या टेक कंपनीत इंटर्नशिपची संधी दार ठोठावत आहे. अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी करणाऱ्या भारतीय विदयार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेत कॉम्प्युटर शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात माठी टेक कंपनी गुगलने समर २०२५ साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिप भरती जाहीर केली आहे.

ही संधी खासकरून अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी करणाऱ्या विदयार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. Googleच्या अधिकृत बेबसाईटनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२५ आहे. ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधीचे दार उघडते, कारण गुगलसारख्या मोठ्या टेक कंपनीत काम करण्याचा अनुभव मिळणार आहे.

इंटर्नशिपसाठी गरजेपेक्षा जास्त अर्ज आल्यास गुगल तारखेच्या आधीही ही भरती बंद करू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना यासाठी लवकर अर्ज करावा लागणार आहे. इंटर्नशिपच्या कार्यकाळात संबंधितांना अमेरिकेत रहावे लागणार आहे. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या पीएचडी धारकांना याचा लाभ घेता येणार आहे.

इंटर्नशिप अर्ज कोण करू शकतो?

  • कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी करणारे विद्यार्थी.

  • मजबूत प्रोगॅमिंग स्किल्स असणारे उमेदवार ( Python, Java, C++ इत्यादी भाषांमध्ये प्राविण्य असणे गरजेचे)

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना गुगलच्या अधिकृत करिअर पेजवर जाऊन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्न PhD समर २०२५ टॅबवर क्लिक करावे. तिथे Applyवर जाऊन अर्जदाराने अर्ज भरावा. त्याठिकाणी तुम्हाला अपडेटेड Resume इंग्रजीत अपलोड करावा लागेल. Updated सीवी आणि एज्युकेशन सेक्शनमध्ये अनऑफिशियल किंवा ऑफिशियल ट्रान्सक्रिप्ट अपलोड करावी. ट्रान्सक्रिप्ट Uplode करण्यासाठी डिग्री स्टेटसमध्ये नाऊ अटेंडिंग पर्याय निवडावा.

इंटर्नशिपचा कालावधी काय, पैसे किती मिळणार?

गुगल इंटर्नशिपचा कालावधी हा १२ ते १४ आठवडे असेल. त्या कालावधीत किती पैसे मिळतील याची माहिती देणयात आली नाही. मात्र या ठिकाणी त्या पदासाठी फुल टाईम Job करणाऱ्यांना २९ लाख रूपयांपासून १.२६ कोटी पगार दिला जातो.

गुगल इंटर्नशिपचे फायदे:

  • उच्च प्रतीचा अनुभव आणि प्रशिक्षण.

  • गुगलच्या ग्लोबल टीमसोबत काम करण्याची संधी.

  • भविष्यात गुगल किंवा इतर मोठ्या टेक कंपन्यांमध्ये पूर्णवेळ जॉब मिळण्याची शक्यता.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT