naukri-job-news

FSSAI Recruitment: तुम्हीही सरकारी अधिकारी होऊ शकता! FSSAI मध्ये नोकरीची संधी;असा कराल अर्ज

FSSAI Recruitment 2024: सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. FSSAI मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अशा पद्धतीने अर्ज करा.

Siddhi Hande

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI मध्ये नोकरीची संधी आहे. FSSAI ने ग्रुप A आणि ग्रुप B साठी रिक्त जागांवरील भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.fssai.gov.in वर अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२४ आहे.

FSSAI मध्ये सहाय्यक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी अधिकाऱ्यांसाठी ही भरती केली जाणार आहे. यात सहाय्यक संचलक पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये मासिक वेतन मिळेल. भारतातील FSSAI कार्यालयांमध्ये तुमची पोस्टिंग केली जाईल. तर प्रशासकीय अधिकारी या पोस्टसाठी ४७,६०० रुपये ते १,५१,००० रुपये मासिक वेतन दिले जाईल.

असिस्टंट डायरेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री प्राप्त असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना ६ वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा. प्रशासकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराला ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.यासाठी उमेदवारांना अर्जाची कॉपी मुदतीपूर्वी FSSAI च्या कार्यालयात पाठवावी लागेल. तुम्हाला सहाय्यक संचालक,FSSAI मुख्यालय, तिसरा मजला,FDA भवन, कोटला रोड, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

Kolhapur Tourism : पश्चिम घाटातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT