Job Opportunity Saam Tv
naukri-job-news

Job Opportunity: सणासुदीच्या काळात रोजगाराची मोठी संधी; १० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार नोकऱ्या

Job Opportunities : सणासुदीच्या काळात रोजागाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. सणासुदीच्या काळात हंगामी कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Siddhi Hande

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गणेशोत्सव सुरु होणार आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दिवाळी सण सुरु होणार आहेत. त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या देशभरात हंगामी कामगारांची भरती सुरु झाली आहे. क्विक कॉमर्स साइट म्हणजेच किराणा, वस्तू विक्री करणाऱ्या ऑनलाइन साइटला कामगारांची गरज आहे.

एका रिपोर्टनुसार, सणासुदीच्या काळात हंगामी कामगारांची मागणी तब्बल ४० टक्के वाढू शकते, असा अंदाज वतर्वण्यात आला आहे. ई-कॉमर्स साइट आणि फूड डिलिव्हरी कंपन्या २० टक्के कामगारांची भरती करु शकतात.

सध्या अॅमेझॉन, स्विगी इन्स्टामार्ट, झेप्टो, ब्लिंकिंट यांसारख्या कंपन्या आपली डिलिव्हरी सर्व्हिस अजून चांगली बनवण्यासाठी हंगामी कामगार भरती करु शकतात. यामुळे तब्बल १०.१२ लाख लोकांना रोजगार मिशू शकत. सध्या ई- कॉमर्स साइटचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वस्तू ऑनलाइन मागवल्या जातात.त्यामुळे सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

यामुळेच लाखो कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. जवळपास ४०-५० लाख हंगामी वाहक देशभरातली किराणी विक्री उद्योगांमध्ये काम करत आहे. त्याचसोबत ३-४ लाख वाहन क्विक कॉमर्स साइटच्या साखळीत काम करत असल्याचे दिसत आहे.

एका ऑर्डरची डिलिव्हरी केल्यानंतर वाहक २०-३० रुपये कमवतात. तसेच सर्ज बेनेफिदेखील त्यांना मिळते. त्यांना १३ ते १५ रुपये सर्ज बेनिफिट म्हणून मिळतात. तसेच हंगामी भरतीसाठी कामगार सुचवल्यावर त्यांना अतिरिक्त भत्ता मिळतो. म्हणजेच एका ऑर्डरमागे त्यांना ४० ते ५० रुपये मिळतात. जवळपास ३३ टक्के हंगामी कामगार ई- कॉमर्स क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे येत्या सणासुदीला लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT