ESIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ESIC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, ESIC मध्ये मोठी भरती, पगार १७०००० रुपये; वाचा सविस्तर

ESIC Recruitment 2025: ईएसआयसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तरुणांकडे आहे.कर्मचाी राज्य विमा निगम म्हणजे ESIC मध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सिनियर रेजिडेंट आणि स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ESIC मधील या नोकरीबाबत सविस्तर माहिती esic.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्ही या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

ईएसआयसीमधील या भरती मोहिमेत २४ पदे भती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

सिनियर रेजिडेंट पदासाठी १८ जागा भरल्या जाणार आहेत. स्पेशलिस्ट पासाठी ६ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात MBBS, PG डिप्लोमा, MD/MS डिग्री प्राप्त केलेली असावी.

सिनियर रेजिडेंट पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. स्पेशलिस्ट पदासाठी कमाल वयोमर्यादा ६९ वर्षे असावे.

पगार

सिनियर रेजिडेंट पदासाठी उमेदवाराना ६७,७०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनियर स्पेशलिस्ट पदासाठी १४६२३२ रुपये तर सिनियर स्पेशलिस्ट पदासाठी १७०२०८ रुपये पगार मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्ट स्पेशलिस्ट पदासाठी ६०,००० रुपये महिना वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठ तुम्हाला २८ जुलै रोजी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electrolyte Drink: मधुमेही रुग्णांसाठी इलेक्ट्रोल पावडर योग्य आहे का? जाणून घ्या फायदे-तोटे

Sunday Horoscope : भाग्याला कलाटणी मिळणार, जुन्या गोष्टींमधून फायदा होणार; रविवार ५ राशींच्या लोकांसाठी गेमचेंजर ठरणार

Shatataraka Nakshatra : शततारका नक्षत्रात जन्मलेले लोकअसतात हुशार, धाडसी, पैसा आणि अधिकार मिळवणारे

Success Story: खिशात फक्त १२०० रुपये घेऊन मुंबईत आला, आज आहे ३०० कोटींचा मालक

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

SCROLL FOR NEXT