ESIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी, ESIC मध्ये भरती सुरु, पगार २,५५,९६० रुपये, अर्ज कुठे करावा?

ESIC Recruitment 2025: ईएसआयसीमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. टीचिंग फॅकल्टी पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तरुणांकडे आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सध्या भरती सुरु आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये टीचिंग फॅकल्टी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

ईएसआयसी (ESIC)मध्ये प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर (स्टॅटस्टिशन) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

ईएसआयसीने एकूण ५२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २८ आणि २९ तारखेला होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी esic.gov.in वेबसाइटवर जा.

पात्रता (ESIC Job Eligibility)

या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी, एमएस, डीएनबी पूर्ण केलेले असावे. याचसोबत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. या नोकरीसाठी टीचिंगशिवाय इतर क्षेत्रात कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६९ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये प्रोफेसर पदांसाठी उमेदवारांना 2,55,960 रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट प्रोफेसर पदासाठी 1,70,208 रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 1,46,232 रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपयांचे डिमांड ड्राफ्ट बनवावा लागणार आहे. या नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

SCROLL FOR NEXT