ESIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ESIC Recruitment: ESIC मध्ये नोकरीची संधी; महिन्याला दीड लाख रुपये पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगमअंतर्गत पुण्यातील रुग्णालयात भरती सुरु आहे.ESIC च्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Siddhi Hande

कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच ESIC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ESIC मध्ये सिनियर रेसिडन्ट्स पदासाठी भरती सुरु आहे. १० पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ३ वर्षाच्या कंत्राटी पदावर ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. कर्मचारी राज्य विमा निगमच्या रुग्णालयात जनरल सर्जरी, पॅथोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, AMANESTHESIA या विभागात भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. उमेदवाराने पोस्ट गॅज्युएशनसहित एमबीबीएस डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर २ वर्षांचा पूर्ण केला असावा. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,४२,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे.ESIC हॉस्पिटल, बिबवेवाडी, पुणे-४११ ०३७ येथे तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. याबाबत सर्व माहिती https://www.esic.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.२० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सध्या रेल्वे एनटीपीसीमध्येही नोकरीसाठी भरती सुरु आहे. ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदवीधर आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सर्व माहिती रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT