भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

Heavy Rain in Maharashtra: धाराशिव अन् सोलापुरात पावसाचा जोर कायम. शेतशिवारांचे मोठे नुकसान. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
Heavy Rain in Maharashtra
Heavy Rain in MaharashtraSaam
Published On
Summary
  • धाराशिव अन् सोलापुरात संततधार.

  • शेतशिवारांचे मोठे नुकसान.

  • नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

राज्यातील काही भागांना पावसानं झोडपून काढलं आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला संततधारेचा फटका बसला आहे. जनजीवन विस्कळीत तर झालेच शिवाय शेतीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. या भागात पावसानं जरी ओसरलं असलं तरी, पुढील काही तासांत पाऊस बरसण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली असून, सोलापुरातील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यात पावसाची पुन्हा रिपरिप सुरू आहे. ढग दाटून आल्याने वातावरणात बदल झाला आहे. मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाला पुन्हा फटका बसणार असल्याची माहिती आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरूवात झाली आहे.

Heavy Rain in Maharashtra
उंच डोंगरावर गेले, कारमध्येच शरीरसंबंध ठेवले, पण एका चुकीमुळे दोघांचाही मृत्यू

धाराशिवच्या भूममधील जयवंत नगर येथे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. जयवंत नगर भागातील जमीन पाच ते सहा फुटापर्यंत खचून गेली आहे. घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठे नुकसान झालं आहे. शेतशिवार घरदार याचं नुकसान झालं असून अजून शासकीय यंत्रणा तिथपर्यंत पोहोचलेली नाही.

Heavy Rain in Maharashtra
मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? मुख्यमंत्री महत्त्वाचा निर्णय घेणार

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वपूर्ण असा चांदणी नदीवरील वाकडी गावातील पुलाचे कटडे पुरामध्ये वाहून गेले आहेत. तरीही नागरिकांची या पुलावरून धोकादायकरित्या वाहतूक सुरूच आहे. प्रशासमनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती आणि कठड्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. मोठा अपघात घडल्यावरच बांधकाम विभाग लक्ष देणार का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सोलापुरात पावसानं काहीकाळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. सीना नदीच्या पुराचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. वाडकबाळ पुलावरील पाणी अजूनही ओसरले नाही. यामुळे सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग अद्याप बंदच आहे. सोलापूर - विजयपूर महामार्गाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सोलापुरात अतिवृष्टीचा अंदाज असल्यानं सीना नदीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात येईल. यामुळे नदीकाठच्या लोकांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. माढा,करमाळा, दक्षिण सोलापूरच्या तहसिलदारांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठी असणारी जनावरे आणि घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी तत्काळ हलविण्याच्या सूचनाही देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com