Railway Recruitment: १०वी, १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेमध्ये ३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये ३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. रेल्वेमध्ये सध्या अप्रेटिंस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने नुकतीच याबाबत माहिती माहिती दिली आहे. ९ सप्टेंबर २०२४ रोजी आरआरसीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्जप्रक्रिया २४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी rrcrecruit.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

Railway Recruitment
Teachers Recruitment: राज्य सरकारला दणका! 'शिक्षक भरतीतील ७००० शिक्षकांना कायमस्वरुपी नोकरी द्या', हायकोर्टाचे आदेश

रेल्वेच्या या भरतीमध्ये वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिक,कारपेंटर, लाइटमॅन, वायरमॅन, पेंटर अशा पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे. ३३१५ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

रेल्वे अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असायला हवे. याबाबस सर्व माहिती अधिक-त वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज करावेत.

Railway Recruitment
PMC Recruitment: पुणेकरांनो, महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ६८२ पदांसाठी सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

वयोमर्यादा

रेल्वेच्या या भरतीमध्ये १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतेही लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांची निवड मेरिट बेसवर करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे.

Railway Recruitment
IDBI Bank Job: IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी; मिळणार १,५७,००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com