DRDO Recruitment 2025  saam tv
naukri-job-news

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरीची संधी; ७६४ पदांसाठी भरती; पगार १,१२,४०० रुपये; अर्ज कसा करावा?

DRDO Recruitment 2025: डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ७६४ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लाखो रुपये पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. डीआरडीओ म्हणजे डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या सरकारी संस्थेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. डीआरडीओमधील नोकरीसाठी CEPTAM 11 भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना सेंटर फॉर पर्सोनल टॅलेंट मॅनेजमेंट येथे ही भरती केली जाणार आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B आणि तंत्रज्ञ A साठी भरती केली जाणार आहे. एकूण ७६४ पदे भरली जाणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

डीआरडीओमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ९ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. १८ ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

डीआरडीओमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला पदानुसार १९,९०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.इंजिनियरिंग, टेक्निकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावा.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला drdo.gov.in वर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला CEPTAM ११ वर तुम्हाला जाऊन लिंकवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करायचे आहे.

यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख ही सर्व माहिती भरायची आहे. फोटो आणि सही अपलोड करा.

यानंतर फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Igatpuri Travel: कडाक्याची थंडी अन् दाट धुकं, इगतपुरीतील हे ठिकाण पर्यटकांसाठी ठरतय आकर्षण

EPFO: खासगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं

Amol Kolhe : "यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..."; IndiGo एअरलाइनचा सावळा गोंधळ पाहून अमोल कोल्हे संतापले

Ravi Shastri: ROKO शी पंगा घेऊ नका नाहीतर...! रवी शास्त्रींनी कोणाला सुनावले खडे बोल?

Maharashtra Live News Update: शनीशिंगणापूर देवस्थानचे दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT