DRDO Recruitment Saam Tv
naukri-job-news

DRDO Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार डीआरडीओमध्ये नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

DRDO Recruitment 2025: डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

DRDO मध्ये नोकरीची संधी

अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत म्हणजेच डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओने हैदराबादमधील संशोधन केंद्रात भरती करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२५ आहे.

डीआरडीओमधील या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर drdo.gov.in जाऊन अर्ज करु शकतात. डीआरडीओमधील या भरती मोहिमेत १९५ पदे भरली जाणार आहे. यामध्ये ४० ग्रॅज्युएट अप्रेंटिस, २० टेक्निकल अप्रेंटिस पदे भरती केली जाणार आहे. १३५ आयटीआय ट्रेड अप्रेंटिस पदे भरती केला जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी संबंधित शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. मॅकेनिकल आणि केमिकल विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराकडे इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निकल अप्रेंटिस पदासाठी तुम्ही डिप्लोमा प्राप्त केलेली असावा. आयटीआय ट्रेड अप्रेंटिस पदासाठी फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, मेकॅनिक-डिझेल, ड्राफ्टसमॅन पदासाठी भरती जाहीर केलेली असावी.

पगार

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८पेक्षा कमी नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि स्कील्सच्या आधारे केली जाणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ९००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. डिप्लोमा पदासाठी ८००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT