DRDO Recruitment Saam Tv
naukri-job-news

DRDO Internship: फ्रेशर्स आहात? डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

DRDO Paid Internship 2026: डीआरडीओमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये विविध विभागात पेड इंटर्नशिप करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

DRDO मध्ये इंटर्नशिपची संधी

विविध विभागात केली जाणार भरती

६ महिन्यांची पेड इंटर्नशिप

शिक्षण पूर्ण झालं असेल अन् नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला सरकारी कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. डीआरडीओमध्ये पेड इंटर्नशिपसाठी भरती होणार आहे. डीआरडीओमध्ये हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये ही इंटर्नशिपची संधी आहे. ही इंटर्नशिप ६ महिन्यांसाठी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

डीआरडीओमध्ये एकूण ४० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये केमिकल, इंजिनियरिंग, फिजिक्स, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या विषयात पदवी प्राप्त उमेदवारांसाठी कामाची संधी आहे. एकूण ८ विभागांमध्ये ही भरती होणार आहे.इंजिनियरिंग केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे.४० पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

डीआडीओमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२६ आहे. ही इंटर्नशिप ६ महिन्यांसाठी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला ५००० रुपये पगार मिळणार आहे. ही इंटर्नशिप HEMRL, सुतारवाड़ी, पुणे - 411021 येथे असणार आहे.त्यामुळे तुम्हाला तिथे जावे लागेल.

अर्ज कसा करावा?

इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करायचा आहे.

हा फॉर्म भरायचा आहे. त्यावर नाव, आधार नंबर, शैक्षणिक माहिती सर्व लिहायचं आहे. यानंतर सही आणि फोटो लावा.

यानंतर हा फॉर्म द डायरेक्टर, HERML, सुतारवाड़ी, पुणे 411021 (एचआर विभागात) पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे "ऑपरेशन लोटस" 2.0, झेडपी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार

Gajra Hairstyles: मराठमोळा नखरा अन् केसांत माळा मोगऱ्याचा गजरा, या आहेत 5 सुंदर हेअरस्टाईल्स

Immunity Boost: आहारात या 3 पदार्थांचा करा समावेश, रोगप्रतिकारक शक्ती अन् Metabolism वाढेल; डॉक्टरांनी दिला सल्ला

Raj Thackeray: ही नवीन प्रथा कुठून आली? प्रचारासंदर्भातील आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले

Nandurbar : नवऱ्याचं दुसरीसोबत अनैतिक संबंध, बायकोला कळाल्याने अमानुष मारहाण; महिलेनं संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT