Delhi Metro Job Saam Tv
naukri-job-news

DMRC Recruitment: मेट्रोत नोकरीची संधी; पात्रता १२वी पास; आजच करा अर्ज

Delhi Metro Recruitment: दिल्ली मेट्रोने नवीन भरती जाहीर केली आहे. दिल्ली मेट्रोत टेक्निशियन पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रोने १०वी, १२वी पास आणि आयटीआय पदवी प्राप्त तरुणांसाठी भरती जाहीर केली आहे. दिल्ली मेट्रोत टेक्निशियन पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही delhimetrorail.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला वॉक इन स्क्रिनिंगमध्ये सहभागी व्हावे लागेल.

या नोकरीसाठी अधिूचना २८ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी वॉकइन स्क्रिनिंग होणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्हाला नोकरी मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २७०१४ रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

दिल्ली मेट्रोतील ही भरती आरएस, टॅक्सन, सिव्हिल अँक ट्रेकसहित अनेक विभागांसाठी केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी, १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, कॉम्प्युटर हॉर्डवेअर आणि नेटवर्क मेंटनेंस, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये आयटीआय केलेले असावे.

दिल्ली मेट्रोने ही भरती चैन्नई मेट्रोसाठी जाहीर केली आहे. त्यामुळे टेक्निशियन पदासाठी सक्रिनिंगदेखील तिथेच होणार आहे. तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म स्क्रिनिंगवेळी द्यायचा आहे. तुम्हाला ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लेबर कॉलन, SIDCO, Guindy, चैन्नई 600032 येथे उपस्थित राहायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

Bhagyashree Mote Photos: 'मन धावतया तुझ्याच मागं...' भाग्यश्री मोटेचं सुंदर सौंदर्य

Lip Care: केमिकल नको, घरगुती सामग्रींनी घरीच बनवा लिप बाम; या थंडीत ड्राय ओठांपासून ३ दिवसात मिळेल सुटका

Poor Sleep: तुमच्या 'या' वाईट सवयीमुळे झोप येण्यास येतो अडथळा, आजच टाळा

Last Stop Khanda Marathi Movie: प्रत्येकाला थिरकायला लावणारं "लास्ट स्टॉप खांदा" चित्रपटाचं टायटल साँग रिलीज, चित्रपट या दिवशी होणार रिलीज

SCROLL FOR NEXT