Government Job Saam Tv
naukri-job-news

Coal India Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Coal India Recruitment 2025: कोल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

कोल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

ट्रेनी पदासाठी भरती जाहीर

अर्ज कुठे अन् कसा करावा?

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कोल इंडिया लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे.ट्रेनी पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. कोल इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

कोल इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.

कोल इंडिया लिमिटेडमधील भरती मोहिमेत एकूण १२५ जागांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे जर तुमचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

कोल इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करणा्या उमेदवारांनी इंटरमीडीएट किंवा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पास केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

कोल इंडिया लिमिटेडमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांनी २२,००० रुपये पगार मिळणार आहे. ट्रेनी पदावर तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी उत्तम संधी असेल.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला coalindia.in वर जावे लागेल.

यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाइन या लिंकवर क्लिक करायचे आहे.

यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.

यानंतर सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT