नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीआयएसएफमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सीआयएसएफमध्ये खेळाडूंसाठी नोकरीची संधी आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने ४०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
सीआयएसएफमध्ये स्पोर्ट्समॅन पदासाठी ४०० जागा रिक्त आहे. जीडी कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया १८मेपासून सुरु झाली आहे. cisfrectt.cisf.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (CISF Recruitment 2025)
सीआयएसएफ जीडी कॉन्स्टेबल (CISF Recruitment) पदासाठी कराटे, आर्चरी, फुटबॉल, हँडबॉल, तलवार बाजी, खो-खो, बास्केटबॉल, सायकलिंग, कब्बडी, शूटिंग आणि बॉडी बिल्डिंग खेळ खेळता यायला हवे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी सर्वात आधी जाहिरात वाचावी मगच अर्ज करावेत.
सीआयएसएफमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत त्यांनी संबंधित खेळात स्टेट/ नॅशनल / इंटरनॅशनल खेळांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे.
पात्रता आणि पगार
सीआयएसएफ जीडी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २३ वयोगटातील असावे. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला पे स्केल ४ नुसार २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. या भरती मोहिमेत उमेदवारांची निवड ट्रायल टेस्ट, प्रोफिशियंसी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि वैद्यकीय तपासणीनंतर होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.