Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Recruitment: तरुणांनो बँकर होण्याचे स्वप्न पूर्ण करा, सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची चांगली संधी आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने RESTI आणि ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज मागवले आहेत.ज्या उमेदवारांना बँकेत काम करायचे आहे, त्यांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट पदांसाठी भरती आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै आहे. त्यामुळे त्याआधीच अर्ज करा.

सेंट्रल बँक RSETI फॅकल्टी नोकरी सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवाराचे वय ४० वर्ष असावे. तर ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्जदाराचे वय ३५ वर्ष असावे. सेंट्रल बँकेत आरआरटीआय फॅकल्टीसाठी उमेदावारांनी ग्रामीण विकासामध्ये एमएसडब्ल्यू/एमए/एमए समदाशास्त्र/मानसशास्त्र/ बीएससी (कृषी) पदवी प्राप्त केली असावी. या उमेदवारांना संगणकाची माहिती असावी. स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. ऑफिस असिस्टंट पदासाठी संगणक ज्ञानासह BSW/BA/B.Com मध्ये पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

सेंट्रल बँकेत नोकरी मुलाखतीद्वारे निवडले जातात. यासाठी उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय-जलपाईगुडी, 4 क्रमांक घुमटी, नीलू भवन, पी.ओ येथे पाठवावा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै आहे. जर तुम्ही १ जुलैनंतर अर्ज केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT