Central Bank of India Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Central Bank Recruitment: ७वी पास तरुणांसाठी सेंट्रल बँकेत नोकरीची संधी, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँकेत सध्या ७ वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी आहे.

Siddhi Hande

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ७ वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. ७वी, १०वी, १२वी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या तरुणांसाठी ही भरती जाहीर केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर, फॅकल्टी, वॉचमन अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट centralbank.bank.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी फक्त ४ दिवस उरले आहेत.

ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI-SUAPS) साठी आहे. ही सर्व पदे या कार्यक्रमासाठी भरती केली जाणार आहे. वॉचमन कम गार्डनर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ७वी पास असणे गरजेचे आहे. अटेंडेंट पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. ऑफिस असिस्टंट पदासाठी बी.ए, बी कॉम पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. फॅकल्टी पदासाठी एमएसडब्ल्यू/एमए/समाजशास्त्र/बी.एससी/बीए आणि बी.एड असलेले कोणतेही पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर अर्ज करु शकतात. यासंबंधित अधिसूचना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.१ वर्षांच्या कालावधीसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १२००० ते ३०,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला तुमचा अर्ज आणि वैयक्तिक माहिती प्रादेशिक कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धंजल कॉम्प्लेक्स, सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज जवळ, अंबिकापूर, सुरगुजा, छत्तीसगज येथे पाठवायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर येथे गोकुळच्या डिबेंचर कपाती विरोधात दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा

Kalyan : खिशातून १,५०,००० रुपयांचा मोबाइल गायब; पठ्ठ्याने बस थांबवून घेतली प्रवाशांची झडती, कल्याणमधील घटना

Diwali Mithai Recipe: बाजारात मिळणारी मिठाई आता घरीच बनवा, या आहेत ४ चविष्ट रेसिपी

ManaChe Shlok: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘मनाचे श्लोक'चं नाव बदललं; 'या' नव्या नावासह होणार चित्रपट प्रदर्शित

Bihar Elections: भाजपचं पुन्हा धक्का तंत्र! विधानसभा अध्यक्ष, मंत्र्यांना डच्चू; तरुणांना उमेदवारी देत खेळला मोठा डाव

SCROLL FOR NEXT